कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री सप्तशृंगगडावर गर्दी<br />मातेचा साजशृंगार पाहण्यासाठी आले भाविक<br /> वणी / सप्तशृंगगड:- कावडीत ठिकठिकाणचे जल घेऊन कावडधारक भाविक कोजागिरी पौर्णिमेला खानदेश प्रातांसह विविध ठिकाणावरून सप्तशृंगगडावर दाखल झाले होते. कावडीत आणलेल्या जलाने (पाण्याने) सप्तशृंगी मातेवर कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्ताने जलाभिषेक करण्यात आला. मंगळवारी सायंकाळच्या आरती व शांतीपाठानंतर कोजागिरी उत्सवाला सुरवात झाली. जलाभिषेक झाल्यांनंतर भगवतीस भरजरीचे महावस्त्र नेसवित साजशृंगार करण्यात आला नंतर सोन्याचे आभूषणे परिधान करण्यात आली व रात्री बारा वाजता देवीची आरती करण्यात आली.त्यावेळी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.<br />( video - योगेश सोनावणे)<br />#nashik#saptashrugna#kojagirir#esakal#sakalmedia