Surprise Me!

संस्था मोडकळीस आणणाऱ्यांना बॅंकेपासून दूर ठेवा; उदयनराजेंचा सल्ला | SakalMedia

2021-10-21 848 Dailymotion

संस्था मोडकळीस आणणाऱ्यांना बॅंकेपासून दूर ठेवा; उदयनराजेंचा सल्ला | SakalMedia<br />सातारा : जिल्हा बँकेत काहीजण मतदारांचा मतांचा अधिकार काढून घेण्याचा प्रयत्न करतात. माझ्या मतदारसंघातही असाच मतदानाचा अधिकार रद्द करण्याचा डाव काहींनी रचला होता. पण आम्ही वकिल देऊन पुन्हा त्या मतदार सभासदांना मतांचा अधिकार कायम ठेवला, असा गौप्यस्फोट खासदार उदयनराजे भोसले यांनी केला. ज्यांनी सहकारी संस्था मोडकळीस आणल्या, संस्थांचे खाजगीकरण केले, अशा व्यक्तींना जिल्हा बॅंकेपासून सभासदांनी दूर ठेवावे, असा सल्लाही त्यांनी दिला. दरम्यान, पुण्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या बैठकीवरून मतदार सभासदांची बैठक घेऊन त्यांचे मत जाणून घेतले असते तर जास्त संयुक्तिक झाले असते, असा खोचक टोला ही त्यांनी लगावला. गोडोली येथील कार्यक्रमानंतर उदयनराजेंनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी जिल्हा बँकेच्या विषयावरून राष्ट्रवादीच्या नेत्यांवर टीकेची झोड उठवली. (व्हिडिओ : प्रमोद इंगळे)<br />#UdayanrajeBhosale #Satara #Sataradistrictbank

Buy Now on CodeCanyon