Surprise Me!

Tiwasa: पालकमंत्र्यांनी घेतली सेजलच्या बहीण, भावाच्या शिक्षणाची जबाबदारी

2021-10-23 1,236 Dailymotion

#tiwasa #amravati #yashomatithakur<br />तिवसा (जि. अमरावती) : तालुक्यातील शिदवाडी येथील १७ वर्षीय सेजल गोपाल जाधव या मुलीने बुधवारी (ता. २०) गरिबीला कंटाळून राहत्या घरी आत्महत्या केली होती. या कुटुंबाची सात्वन भेट घेऊन पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी सेजलच्या बहीण, भावाच्या शिक्षणाची जबाबदारी घेत कुटुंबाला आर्थिक मदत करीत धीर दिला. कोरोनामुळे अनेकांचे रोजगार बुडाले आहेत. जगणे कठीण झाले आहे. त्यातच वाढत्या महागाईने इंधनाच्या वाढलेल्या दरामुळे जगणे अधिक असह्य झाले आहे. हे खरं असले तरी तरुणांनी आणि विद्यार्थ्यांनी हार मानू नये, असे आवाहन यशोमती ठाकूर यांनी केले. (व्हिडिओ - प्रशिक मकेश्वर)

Buy Now on CodeCanyon