Surprise Me!

मालवणच्या समुद्र किनाऱ्यावर जाळ्यात अडकले डॉल्फिन मासे; पर्यटकांनी केली गर्दी

2021-11-14 1,101 Dailymotion

सिंधुदुर्गातील मालवण चिवला समुद्र किनाऱ्यावर डॉल्फिन मासे सापडले आहेत. १२ नोव्हेंबर रोजी मच्छीमारांनी लावलेल्या जाळ्यात तब्बल १५ डॉल्फिन अडकले. ही बाब निदर्शनास येताच या डॉल्फिन्सला पुन्हा समुद्रात सोडून देण्यात आले. मालवण चिवला समुद्र किनारा हा सफारी आणि डॉल्फिन दर्शनासाठी प्रसिध्द आहे. दरम्यान हे डॉल्फिन पाहण्यासाठी पर्यटकांनी मोठी गर्दी केली होती.

Buy Now on CodeCanyon