#karad #satara #karadnews #pruthvirajchavan #diesel #petrol<br />कऱ्हाड (सातारा) : केंद्र सरकारनं (Central Government) दुसरीकडं बोट दाखविण्यापेक्षा पेट्रोल-डिझेलबाबत तुम्ही किती कर घेता व राज्य सरकार किती कर घेते याची तुलना करावी. त्यानंतर राज्य सरकार (Maharashtra Government) त्यांच्या पातळीवर दर कमी करेल, अशी अपेक्षा माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी व्यक्त केली. कॉंग्रेसच्या महागाई विरोधातील रॅलीनंतर आमदार चव्हाण यांनी पत्रकरांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी ही अपेक्षा व्यक्त केलीय. (व्हिडिओ : सचिन शिंदे)