#islampur #sangali #meeting #sangalinews #islampurnews<br />इस्लामपूर (सांगली) : भुयारी गटार योजनेचे काम आधी मार्गी लावा मगच पुढच्या विषयांवर चर्चा करा, असा आक्रमक पवित्रा नगरसेवकांनी घेतल्याने आजची सभा तहकूब करावी लागली. मागच्या सभेत झालेले ठराव अमलात केव्हा येणार? या प्रश्नावर प्रशासन निरुत्तर झाले. भुयारी गटरच्या कामांसाठी प्रशासनाने २० जानेवारीपर्यंत मुदत मागितली. त्यानंतरच बाकीचे विषय चर्चेला घेण्यात येणार आहेत. दरम्यान भुयारी गटर आणि मागासवर्गीय कल्याण समितीची स्थापना या मुद्द्यावर मोठा गदारोळ झाला.
