Surprise Me!

Satara ; लोणंदच्या विकासासाठी कॉंग्रेसला एकहाती सत्ता द्या - पृथ्वीराज चव्हाण; पाहा व्हिडीओ

2021-11-28 586 Dailymotion

Satara ; लोणंदच्या विकासासाठी कॉंग्रेसला एकहाती सत्ता द्या - पृथ्वीराज चव्हाण; पाहा व्हिडीओ <br />लोणंद (सातारा) : लोणंद शहराच्या विकासासाठी कॉंग्रेसला एकहाती सत्ता देण्याचे आवाहन राज्याचे माजी मुख्यमंत्री व आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. लोणंद नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येथील राधेशाम पॅलेस मंगल कार्यालयात कार्यकर्त्यांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस राजेंद्र डोईफोडे, खंडाळा तालुका काँग्रेसचे उपाध्यक्ष सर्फराज बागवान, खंडाळा तालुका महिला काँग्रेसच्या अध्यक्ष शैलजा खरात, दादासाहेब शेळके - पाटील, सोपानराव क्षीरसागर, दत्तात्रय खरात, म्हस्कूअण्णा शेळके-पाटील, अॅड. हेमंत खरात, रमेश कर्नवर, अॅड. बबलूभाई मणेर, इम्रान बागवान, प्रवीण डोईफोडे,इकबाल बागवान आदी प्रमुख उपस्थित होते. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, यावेळी स्व. अॅड. बाळासाहेब बागवान यांच्याशिवाय नगरपंचायतीची निवडणूक होत आहे. ज्यांना कोणाला काँग्रेसबरोबर यायचे आहे, त्यांनी कॉंग्रेसच्या चिन्हावर लढावे. (व्हिडिओ : रमेश धायगुडे<br />#satara #congresspartyworkersmeet #prithvirajchavan #appeal #breakingsatara #esakal #sakalmedia

Buy Now on CodeCanyon