Surprise Me!

स्तंभलेखिका ते राज्यसभेच्या सदस्या; जाणून घ्या प्रियंका चतुर्वेदींच्या कारकिर्दीबद्दल

2021-11-30 1,118 Dailymotion

संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला २९ नोव्हेंबरपासून सुरुवात झाली. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी १२ खासदारांचं निलंबन करण्यात आलं. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात बेशिस्त वर्तन केल्यामुळे विरोधी पक्षातील १२ खासदारांचे निलंबित करण्यात आलं. या १२ खासदारांमध्ये काँग्रेसचे सहा, तृणमूल काँग्रेसचे दोन, भाकप आणि माकपच्या प्रत्येकी एक आणि शिवसेनेच्या दोन खासदारांचा समावेश आहे. निलंबित खासदारांना संपूर्ण हिवाळी अधिवेशनातील कामकाजात सहभागी होता येणार नाही. निलंबित झालेल्या खासदारांमध्ये शिवसेनेच्या प्रियंका चतुर्वेदी यांचा देखील समावेश आहे. प्रियंका चतुर्वेदींबद्दल या व्हिडीओच्या माध्यमातून जाणून घेऊया. सोबतच त्यांच्या राजकीय कारकिर्दीवर एक नजर टाकूया.

Buy Now on CodeCanyon