Surprise Me!

३ मिनिटांत ९०० कर्मचाऱ्यांना दाखवला घरचा रस्ता; भारतीय वंशाच्या CEOची जगभरात चर्चा

2021-12-07 2,013 Dailymotion

अमेरिकेमधील न्यूयॉर्कमधील एका कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याने तीन मिनिटांमध्ये ९०० जणांना नोकरीवरुन काढून टाकल्याचा प्रकार समोर आला आहे. बेटर डॉट कॉम नावाच्या कंपनीमधून ही कर्मचारी कपात करण्यात आलीय. डेली मेलने दिलेल्या वृत्तानुसार या कंपनीचे सीईओ विशाल गर्ग यांनी मागील बुधवारी कर्मचाऱ्यांसोबत झूम कॉल केला होता. याच बैठकीत गर्ग यांनी ९०० कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकलं. गर्ग हे भारतीय वंशाचे असल्याचे या बातमीची भारतामध्येही चांगलीच चर्चा रंगलीय. जगभरामध्ये विशाल यांनी कर्मचाऱ्यांशी संवाद साधल्याचा हा व्हिडीओ चर्चेचा विषय ठरतोय.<br /><br />#newyork #job #unemployment #betterdotcom #vishalgarg

Buy Now on CodeCanyon