विकी कौशल हा बॉलीवूडला मिळालेला एक विश्वासू नट तर कतरिना कैफ हे बॉलीवूड सिनेमाला लाभलेलं आरसपानी सौंदर्य. पहायला गेलं तर कतरिना विकीला सर्वच बाबतील सीनियर, ती विकीपेक्षा पाच वर्षांनी मोठी आहे आणि सिनेइंड्स्ट्रीत ती विकीच्या जवळपास सात-आठ वर्षे आधी आलेली आहे. आता दोन बॉलीवूडचे फेमस चेहरे लग्न करतायत म्हटल्यावर चर्चा तर होणारंच. सिनेकरिअरमध्ये यशाचा पल्ला गाठल्यानंतर विकी-कतरिना आयुष्याचं नवं हॅपनिंग पर्व सुरू करीत आहेत यातही त्यांना आनंद,यश मिळो या शुभेच्छा.<br />#wedding #vickykaushal #katrinakaif #sakal
