नाशिक(Nashik) : मागील दिड वर्षांच्या ब्रेक नंतर पुन्हा सुरु झालेल्या शाळेत विद्यार्थ्यांचे उत्सहात स्वागत केले जात आहे. या दरम्यान जिल्हा परिषद शाळा कोणे, तालुका त्रंबकेश्वर(trimbakeshwar) येथे पहिली ते चौथी पर्यंतच्या विध्यार्थ्यांना बैलगाडीत बसवून त्यांची गावातून मिरवणूक काढण्यात आली, तसेच गुलाबपुष्प देऊन त्यांचे शाळेत स्वागत करण्यात आले. शाळा सुरू झाल्याने विद्यार्थ्यांचा चेहऱ्यावरवरचा आनंद ओसंडून वाहताना दिसत होता.<br />#nashik #nashiknews #schoolreopen #schoolreopeningjoy #students