#Sugarcane #fFire #GirlDeath #NandiniVarvi #MaharashtraTimes<br />ऊसाच्या फडात पाचोळ्याला लागलेल्या आगीत अकरा महिन्याच्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. कराड तालुक्यातील बनवडी गावात ही दुर्दैवी घटना घडली आहे. नंदिनी वरवी असं भाजून मृत्यू झालेल्या चिमुकलीचं नाव आहे. नंदिनीची आई तीला झोपवून ऊस तोडणीसाठी गेली होती. घटनास्थळी पोहचताच मजुरांनी तिला तातडीने कृष्णा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच नंदिनी मृत्यू झाल्याचं तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.