Surprise Me!

लहान मुलांसाठी 'कोवावॅक्स' ही करोना लस ६ महिन्यांत उपलब्ध होणार; आदर पूनावालांची घोषणा

2021-12-15 44 Dailymotion

दीड वर्षाहून अधिक काळ लोटला तरी करोनाचं संकट गेलेलं नाहीये. डेल्टा नंतर आता ओमायक्रॉन या करोनाच्या नव्या विषाणूने डोकं वर काढलंय. करोनामुळे गेले दीड वर्ष बंद असलेल्या राज्यभरातील शाळा सुरु करण्यात आल्या आहेत. परंतु १८ वर्षाखालील मुलांचे लसीकरण न झाल्याने पालक चिंतेत आहेत. लहान मुलांसाठी काढण्यात येणाऱ्या लसीवर देशभरात संशोधन सुरु आहे. मात्र या संस्थांकडून लहान मुलांसाठी करोनावरील लस कधी येईल याबद्दल कोणतीही माहिती अद्याप देण्यात आलेली नाही. ओमायक्रॉनचा वाढता धोका आणि लहान मुलांच्या लसीकरणाबाबत चिंता सतावत असताना सिरम इन्स्टिट्युटचे आदर पुनावाला यांनी याबाबत सकारात्मक माहिती दिली आहे. पुढील सहा महिन्यांत करोनावरील लहान मुलांसाठीची लस बाजारात आणली जाईल, असं आदर पुनावाला यांनी सांगितलं आहे.<br /><br />#coronavirus #vaccine #COVID19 #AdarPoonawalla #SerumInstitute #childrens #coronavaccation

Buy Now on CodeCanyon