Surprise Me!

Jalgaon : मूलभूत सुविधांसाठी महापालिकेच्या प्रवेशद्वारावरच ठिय्या आंदोलन

2021-12-15 6 Dailymotion

#Agitation #MahavikasAghadi #MunicipalAdministration #MaharashtraTimes<br />जळगाव महापालिकेत शिवसेनेची सत्ता आहे. तर राज्यातील महाविकास आघाडीच्या सत्तेत शिवसेना सहभागी आहे. असे असतानाही जळगावकरांना मुलभूत सुविधांपासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. शिवसेनेविरोधात थेट राज्यातील सत्तेत सहभागी असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसनेच आंदोलनाचा बडगा उगारला आहे. महापालिका प्रशासनाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने जोरदार घोषणाबाजी करत बुधवारी महापालिकेच्या प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केले. शहरात जागोजागी खड्डे असून त्याचा प्रचंड त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे दुसरीकडे स्वच्छताही होत नाही. त्यामुळे स्वच्छतेचा ठेका असलेल्या वॉटरग्रेसचा दिलेला स्वच्छतेचा मक्ता रद्द करावा,वाढीव घरपट्टी माफ करावी या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले.

Buy Now on CodeCanyon