#FlowerFormation #LockdownPeriod #BloomFarm #MaharashtraTimes<br />एका फुलाच्या निर्मितीसाठी जवळपास दोन रुपये खर्च येतो. दररोज साडेतीन ते चार हजार फुले वाया जात होती. मात्र, संयम ठेवला आणि आत्महत्याग्रस्त असलेल्या यवतमाळ जिल्ह्याची नवीन ओळख निर्माण झाली. लॉकडाऊन काळात झालेल्या नुकसानीमुळे निराश न होता नव्या उमेदीने भरारी घेतली. ज्या पिकांना दररोज मागणी असते असे उत्पादन घेण्याचे त्यांनी ठरवले. यात फुलशेती ही अग्रक्रमावर आली. आणि इथून तिन मित्रांची सुरुवात झाली ती फुलशेती करण्याच्या कामाला... ब्लूम फार्म या नावाने पॉलिहाऊसची निर्मिती झाली आणि यातून 'जरबेरा' या फुलशेतीचा उगम झाला.