#ROwaterplant #BJPCongressWorkers #MaharashtraTimes<br />सध्या निवडणुकीचे वारे वाहू लागल्याने प्रत्येक पक्षाचे कार्यकर्तेही जोरात कामाला लागले आहेत. अशातच आष्टी तालुक्यातील तळेगाव येथे आरओ वॉटर प्लांटवरून भाजपा काँग्रेसच्या कार्यकर्त्यामध्ये हाणामारी झाली. बुधवारी झालेल्या या हाणामारीचा सर्वत्र व्हिडिओ व्हायरल झाल्याने राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली.