Surprise Me!

Nanded : ॲड. गुणरत्न सदावर्ते यांच्या कार्यक्रमात करोना नियमांना हरताळ

2021-12-17 0 Dailymotion

#AdvGunratnaSadavarte #CoronaRules #MaharashtraTimes<br />नांदेड येथे अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्या कौटुंबिक कार्यक्रमात एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांचा मेळावा असल्याची प्रचिती आलीय कारण या खासगी कार्यक्रमासाठी सदावर्ते यांच्या आप्तेष्ठांपेक्षा एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांची मांदियाळी पाहायला मिळाली. या कार्यक्रमात नांदेड,हिंगोली, परभणी,लातूर, यवतमाळ जिल्ह्यातील जवळपास दहा ते पंधरा हजारांपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. सध्या देशभरात ओमायक्रोनचे सावट देशावर आहे. सरकार गर्दी टाळा,त्रिसूत्री पाळा असे म्हणत असताना या कार्यक्रमात आलेल्या नागरिकांनी कुठेही कोरना नियमांचं पालन केल्याचं पाहायला मिळालं नाही. त्यामुळे करोना काळात या कार्यक्रमामुळे करोना नियमांची ऐशीतैशी झाल्याचं पाहायला मिळालं.

Buy Now on CodeCanyon