#MNS #Agitation #Municipality #MaharashtraTimes<br />अंबरनाथमध्ये मनसेनं खड्ड्यांभोवती रांगोळ्या काढत अनोखं आंदोलन केलं आहे.खड्ड्यांकडे पालिकेचं लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले.अंबरनाथ पूर्वेच्या शिवगंगा नगरमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. अनेक प्रमुख रस्ते खड्ड्यात गेले असून अंतर्गत रस्त्यांचं मात्र काँक्रीटीकरण करण्यात आले. रस्त्यांची साधी डागडुजी सुद्धा पालिकेकडून करण्यात आलेली नाही. त्यामुळं आज पालिकेचं लक्ष वेधण्यासाठी मनसेनं हे आगळंवेगळं आंदोलन केलं.
