प्रो-कबड्डी लीगचा आठवा हंगाम २२ डिसेंबर २०२१ ते २० जानेवारी २०२२ दरम्यान खेळवला जाणार आहे. या स्पर्धेचा सातवा सीजन २०१९मध्ये खेळविण्यात आला होता. करोनामुळे गेल्या वर्षी ही लीग होऊ शकली नव्हती. त्यानंतर यंदा ती आयोजित केली जात आहे. यामध्ये १२ संघ सहभागी होणार असून ही लीग बेंगळुरू येथे होणार आहे. मात्र, यावेळी हे सामने प्रेक्षकांविना रिकाम्या स्टेडियममध्ये खेळवले जाणार आहेत. पण प्रेक्षक टीव्हीवर त्याचा आनंद घेऊ शकतात. सामन्यांचे लाइव्ह स्ट्रीमिंग कुठे होणार, मोबाईलद्वारे सामने कसे आणि कुठे बघता येणार? याबद्दल जाणून घेऊया या व्हिडीओच्या माध्यमातून.<br /><br />#ProKabaddiLeague2021 #ProKabaddi #Sports <br />