Surprise Me!

Mumbai : मुंबईत गिरणी कामगारांना हक्काचं घर मिळणार, आव्हडांची विधानपरिषदेत घोषणा

2021-12-22 4 Dailymotion

#GirniKamgar #JitendraAwhad #MaharashtraTimes<br />मुंबईत गिरणी कामगारांना हक्काचे घर देण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे. त्यासाठी म्हाडा अंतर्गत स्वतंत्र सेल तयार केला जाईल अशी घोषणा गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी विधान परिषदेत केली. जी घर मुंबईत गिरणीच्या जागेत तयार होतील ती प्राधान्याने गिरणी कामगारांना देण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे. याबाबत लोकांच्या तक्रारी ऐकण्यासाठी म्हाडा अंतर्गत स्वतंत्र सेल देखील तयार करण्यात येणार आहे. जमिनीची उपलब्धता हा कठीण विषय असून विविध विभागांशी संपर्क करून जमीन उपलब्ध करून घेतली जात आहे. जमीन उपलब्ध होताच उर्वरित गिरणी कामगारांना घरांचा प्रश्न मार्गी लागेल असंही मंत्री आव्हाड यावेळी म्हणाले.

Buy Now on CodeCanyon