Surprise Me!

नंदुरबार : सारंगखेडा येथील अश्व प्रदर्शनात नाशिकचा 'रावण घोडा' ठरतोय चर्चेचा विषय

2021-12-22 3 Dailymotion

नंदुरबार जिल्ह्यातील सारंगखेडा यात्रेत राज्यातील विविध भागांमधून घोडे विक्रीसाठी दाखल होत असतात. यंदा मात्र नाशिक येथून आलेला रावण घोडा सर्वांचंच लक्ष वेधून घेतोय. ६७ इंच इतकी उंची असलेला हा घोडा पूर्णतः काळ्या रंगाचा असून त्याच्या कपाळावर पांढऱ्या रंगाचा ठिपका आहे. या घोड्याला तब्बल ५ कोटी रुपये इतकी मागणी आली होती. परंतु या घोड्याच्या मालकाने घोड्याच्या विक्रीसाठी नकार दिलाय.

Buy Now on CodeCanyon