Surprise Me!

अकोल्यात 49 दिवसानंतर शेगावसाठी निघालेल्या एसटी बसवर दगडफेक

2021-12-23 51 Dailymotion

अकोल्यातील आगार क्रमांक दोन वरून तब्बल 49 दिवसानंतर शेगावकरीता मार्गस्थ झालेल्या एसटी बसवर रिधोरा जवळ अज्ञातांनी दगडफेक केली. पोलीस बंदोबस्तात ही प्रवासी वाहतूक सुरु करण्यात आली. मात्र तरीही अज्ञातांनी बसवर दगडफेक केली. एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करण्याच्या मागणीवरून एसटी कर्मचाऱ्यांचं गेल्या दीड महिन्यापासून आंदोलन सुरु आहे. कामावर रुजू झालेल्या सतीश दौड या चालकाने अकोला आगाराबाहेर बस काढली आणि काही अंतरावरच बसवर दगडफेक करण्यात आली.

Buy Now on CodeCanyon