#AdityaThackeray #BhandupBMCHospitalChildDeath #MaharashtraTimes<br />आशिष शेलार यांनी आदित्य ठाकरेंवर टीका केली आहे.महानगरपालिकेच्या भांडूप येथील सावित्रीबाई फुले प्रसुतिगृहामधील एनआयसीयू मध्ये उपचार घेत असलेल्या चार बालकांचा सेप्टिक इन्फेक्शनमुळे मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे..यावर आशिष शेलार यांनी याबाबत टीका केली आहे. "मेडिकल चौकशी निष्पक्ष होऊन फौजदारी चौकशी सुद्धा करावी. दुःखद घटना झाल्यावर देखील उपनगरचे पालकमंत्री यांनी भेट द्यायला पाहिजे होती पण ते आले नाहीत. सी लिंकवर विद्यूत रोषणाई करण्यात दंग आहे.हे दुर्दैव आहे." अस म्हणत शेलारांनी आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला.