Surprise Me!

सैफ आणि करीनाच्या मुलाच्या नावाचा प्रश्न विचारल्यामुळे गोंधळ; शाळेला बजावली कारणे दाखवा नोटीस

2021-12-25 176 Dailymotion

बॉलीवूडचा नवाब सैफ अली खान आणि अभिनेत्री करीना कपूर बॉलीवूडमधील लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहेत. सैफ आणि करीनाप्रमाणेच त्यांची मुलंदेखील अनेक वेळा चर्चेचा विषय ठरली आहेत. पण यावेळी मात्र एका वेगळ्याच कारणामुळे हे कुटुंब चर्चेत आलंय. मध्य प्रदेशातील एका शाळेच्या प्रश्नपत्रिकेत अभिनेता सैफ अली खान-अभिनेत्री करीना कपूर यांच्या मुलाचे नाव काय?, असा प्रश्न विचारण्यात आला. यानंतर पालक संघटनेने शिक्षण विभागाकडे तक्रार केली आहे. या तक्रारीनंतर जिल्ह्यात खळबळ उडाली असून शाळेला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. यासोबतच शालेय शिक्षण विभागाकडून कारवाई केल्याचे सांगितलं जातंय.

Buy Now on CodeCanyon