काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेसने मुक्ताईनगरात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचे अवैध धंदे असल्याचा आरोप करत पोलीस अधीक्षकांना निवेदन दिले होते. त्यावर शिवसेना पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत असा कुठलाही प्रकार नसल्याचे उत्तर दिले होते. आता रोहिणी खडसेंच्या आमदाराला चोप देण्याच्या वक्तव्यामुळे पुन्हा राजकीय गोटात खळबळ उडाली असून महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचे बोलले जात आहे.