Surprise Me!

अजित दादांच्या ताफ्याचं सारथ्य महिला कॉन्स्टेबलकडे

2021-12-26 117 Dailymotion

उपमुख्यमंत्री अजित पवार आज सिंधुदुर्गच्या दौऱ्यावर होते. त्यांच्या गाडीचे सारथ्य खाकीतील नारी शक्तीने केल्याने सिंधुदुर्ग पोलिसांची मान अभिमानाने उंचावली आहे. रविवारी सिंधुदुर्ग जिल्ह्यात राज्याचे मंत्री आले होते. तिन्ही मंत्र्यांनी एकाच गाडीतून प्रवास केला. या गाडीचे सारथ्य महिला पोलीस कॉस्टेबल तृप्ती मुळीक यांनी केलं. त्या मूळच्या कोल्हापूर जिल्ह्यातील अंबप पाडळी गावच्या रहिवासी असून सध्या त्या मोटर परिवहन विभागात कार्यरत आहेत. लहानपणापासून ड्रायव्हिंगची आवड असल्याने 23 डिसेंबर, 2021 रोजी त्यांनी व्हीआयपी ड्रायव्हिंगचा कोर्स पूर्ण केल्यानंतर, आजचा दिवस हा त्यांच्या या नव्या जबाबदारीचा पहिलाच दिवस होता. त्यात त्या यशस्वी झाल्या आहेत.

Buy Now on CodeCanyon