नांदेड ः महावितरणने शेतकऱ्यांची थकीत वीज बिल वसुलीसाठी मोहीम सुरु केली आहे. परिणामी ऐन रब्बीच्या काळात पीकांना पाणी देण्याची लगबग सुरु आहे. तसेच वीज कपातीमुळे जनावरांनाही पाणी मिळेनासे झाले आहे. अगोदरच शेतकरी नापीकीमुळे त्रस्त असताना अशातच महावितरणच्या वतीने शेतकऱ्यांची वीजबील कपात करण्याचा सपाटा सुरु आहे. त्यामुळे अर्धापूर येथील शेतकऱ्यांनी महावितरण कार्यालयासमोर लेकरा-बाळांसह येऊन संताप व्यक्त केला. <br />(व्हिडिओ ः लक्ष्मीकांत मुळे, अर्धापूर सकाळ बातमीदार)<br /><br /><br />