Surprise Me!

पंढरपूर - बिगबॉसच्या विजयानंतर विशाल निकम पोहचला विठ्ठलाच्या दर्शनाला

2021-12-31 19 Dailymotion

बिगबॉस मराठीच्या तिसऱ्या पर्वात विजयी ठरलेल्या विशाल निकमने पंढरपूरच्या विठ्ठलाचं दर्शन घेतलं आहे. विशालने त्याचा हा विजय विठ्ठलाच्या चरणी समर्पित केला आहे. विशाल हा या पर्वातील सर्वांचा आवडता खेळाडू ठरला. त्याचा नम्र स्वभाव आणि खेळाबद्दलची चिकाटी यांनी सर्वांचंच मन जिंकलं. विशालची विठ्ठलाच्याप्रति असलेली श्रद्धा संपूर्ण महाराष्ट्राने बघितली. जेतेपद पटकावल्यानंतर लगेचच विशाल पंढरपूरच्या विठ्ठलाच्या दर्शनाला आला. दर्शन घेतल्यानंतर चाहत्यांनी त्याच्याभोवती गर्दी केल्याचं पाहायला मिळालं.<br /><br />#VishalNikam #BiggBossMarathi3 #Pandharpur #ShivaliPatil <br />

Buy Now on CodeCanyon