Surprise Me!

थर्टीफस्टसाठी मासळी प्रेमींना मोजावा लागतोय दुप्पट दाम; २००-३०० रुपयांनी वाढले माशांचे दर

2021-12-31 120 Dailymotion

थर्टीफस्ट डिसेंबरच्या निमित्ताने आज अनेक ठिकाणी मांसाहारी जेवणाचा बेत असणार आहे. याचसाठी लोकांनी मासळी बाजारात गर्दी केल्याचं पाहायला मिळतंय. पण नवी मुंबईच्या मासळी बाजारात मात्र माशांच्या भाव २०० ते ३०० रुपयांनी वाढला आहे. थर्टीफस्टच्या निमित्ताने आज नवी मुंबई येथे मच्छी महाग झाली आहे. यात पापलेट १५०० ते १८०० रुपये किलो, बोंबील ४०० रुपये, कोळंबी ७०० रुपये किलो, हलवा ८०० रुपये, चिंबोरी २००० रुपये, रावस १००० रुपये तर बांगडा ४०० रुपये या दराने विकला जात आहे.<br /><br />#fishmarket #NaviMumbai #newyear2022

Buy Now on CodeCanyon