पोलिसांनी शनिवारी पाच वाजल्यानंतर आझाद मैदानातील आंदोलकांना बाहेर जाण्यास सांगितले. मुंबईत सार्वजनिक ठिकाणी संध्याकाळी पाच ते पहाटे पाचपर्यंत जमावबंदी करण्यात आली आहे. त्यामुळे पोलिसांनी शनिवारी पाच वाजल्यानंतर आझाद मैदानातील आंदोलकांना बाहेर काढलं. एसटी आंदोलकांनीही सहकार्याची भूमिका घेत मैदानातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. <br />परंतु, हे आंदोलन सुरुच ठेवणार असल्याचेही संपकरी कर्मचाऱ्यांनी स्पष्ट केले.
