पुण्यातील मुंढवा परिसरात साई पार्क सोसायटीमध्ये खाजगी केबल व्यवसायिकाच्या निष्काळजीपणामुळे एका बारा वर्षीय मुलाच्या डोक्यात चार फुटी रॉड घुसल्याची धक्कादायक घटना घडली आहे. <br /><br />एका बिल्डिंगच्या चौथ्या मजल्यावरून केबलची वायर ओढत असताना, वायर ओढण्यासाठी वापरण्यात येणारा चार फुटांचा लोखंडी रॉड चाळीस फुटांवरून निसटून रस्त्यावरून चालणाऱ्या मुलाच्या डोक्यात सरळ घुसला. सध्या त्याच्यावर हडपसर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. केबल व्यवसायिकावर मुंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.<br />#pune #punenews #viralvideo #boyinjuredwithsrod #mundhwa<br />