Pune l पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेवर राष्ट्रवादी चे वर्चस्व l NCP dominates Pune District Central Bank l Sakal

महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रात उच्च स्थानी असलेल्या पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळ निवडणुकीची मतमोजणी आज पुण्यातील अल्पबचत भवन येथे सुरू आहे.

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ७ जागांवरील आज मतमोजणी होत असून मुळशीचा पहिला निकाल हाती आला. मुळशी तालुका मतदारसंघातून बॅंकेचे माजी अध्यक्ष आत्माराम कलाटे यांना धक्का देत राष्ट्रवादी कॉंगेसच्या सुनील चांदेरे यांनी विजय मिळवला. चांदोरे यांना २८ मत मिळाली.

बॅंकेचे माजी अध्यक्ष आत्माराम कलाटे आणि प्रकाश म्हस्के यांचा धक्कादायक पराभव झाला आहे. या तीनही मतदारसंघात मतदारांनी नवीन चेहऱ्यांना पसंती दिली आहे.

हवेली तालुका अ वर्ग मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि बॅंकेचे माजी अध्यक्ष प्रकाश म्हस्के आणि राष्ट्रवादीचेच विकास दांगट यांच्यात मैत्रीपूर्ण लढत झाली. या लढतीत दांगट यांनी सुमारे १५ मतांनी विजय मिळवला आहे. म्हस्के यांचा धक्कादायक पराभव झाला आहे. दांगट यांना ७३ तर, म्हस्के यांना ५८ मते मिळाली आहेत.

शिरूरचे आमदार अशोक पवार हे ८६ मतांनी विजयी झाले आहेत. त्यांना १३२ पैकी १०९ मते मिळाली आहेत. त्यांचे प्रतिस्पर्धी अपक्ष उमेदवार आबासाहेब गव्हाणे यांना २३ मते मिळाली आहेत.

मुळशी तालुका मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या सहकार पॅनेलचे उमेदवार सुनील चांदेरे विजयी झाले आहेत. त्यांनी बॅंकेचे माजी अध्यक्ष आत्माराम कलाटे यांचा पराभव केला आहे. येथील एकूण ४५ मतांपैकी चांदेरे यांना २८ तर, कलाटे यांना १७ मते मिळाली.

पुणे जिल्हा सहकारी बँकेच्या एकूण २१ जागा असून त्यापैकी १४ जागा बिनविरोध झाल्या, तर ७ जागांसाठी २ तारखेला मतदान पार पडले होते. गेल्या अनेक वर्षांपासून या बँकेवर राष्ट्रवादीचे दिग्गज नेते अजित पवार यांचे वर्चस्व आहे.