Surprise Me!

भाजपची मदत मिळाल्यानं जिंकलो! शिवसेना आमदाराचं खळबळजणक व्यक्तव्य

2022-01-09 583 Dailymotion

गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर येत आहेत. आता पुन्हा एकदा शिवसेनेच्या आमदारानं पक्षाला घरचा आहेर दिलाय. पंढरपूर येथील एका खासगी हॉस्पिटलच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना आमदार शहाजीबापू पाटील यांनी मनातील खदखद व्यक्त केली. महाविकास आघाडी सरकारमध्ये विचारलं जात नाही, घर की कोंबडी दाल बराबर असं म्हणत सांगोल्याचे शिवसेना आमदार शहाजीबापू पाटील यांनी पुन्हा एकदा सरकारवरच कुरघोडी केलीय. शहाजीबापू पाटील हे सांगोल्यातून निवडून आलेले शिवसेनेचे आमदार आहेत. मात्र, तालुक्यात शिवसेनेची केवळ 1100 मतं असूनही मी आमदार झालो. कारण माझ्या विजयात मला भाजपची मोलाची साथ मिळालीयं. तसेच, खासदार रणजित निंबाळकर यांच्यामुळे पुन्हा आपल्याला आमदारकी मिळाली. या निवडणुकीत भाजपचं माझ्यावर 24 तास लक्ष होतं. सारखी काही अडचण आल्यास, मला त्यांचा विचारायला फोन यायचा.. असं देखील शहाजीबापू यांनी यावेळी म्हटलयं.

Buy Now on CodeCanyon