Surprise Me!

अलिबाग वन विभागाच्या कार्यालयासमोर आदिवासी बांधवांचं बेमुदत उपोषण

2022-01-11 10 Dailymotion

रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील कोरलवाडी आदिवासी समजातील बांधव अनेक वर्षांपासून मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. या आदिवासी वाडीत 40 घर असून दीडशे जण राहतात. एखादा व्यक्ती आजारी पडल्यास डोलीत टाकून उपचारासाठी शहरात आणावे लागते. कोरलवाडीला जाणारा रस्ता तीन किलोमीटरचा असून दोन वर्षापासून या रस्त्याला मंजूरी मिळाली आहे. परंतु वन विभागाकडून रस्त्याला मंजुरी मिळत नसल्याने रस्त्याचं काम अजूनही रखडलं आहे. निवेदन, मोर्चा काढूनही वन अधिकारी दखल घेत नसल्याने वन विभाग कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केलयं. जोपर्यत मागण्या मान्य पूर्ण होत नाहीत तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही असा पवित्रा या आदिवासी बांधवांनी घेतला आहे.

Buy Now on CodeCanyon