नाशिक(Nashik) : उत्तर महाराष्ट्र खान्देश विकास मंडळ संचालित आणि जागतिक आहिराणी भाषा संवर्धन परीषद आयोजित दुसरं ऑनलाईन विश्व आहिरानी संमेलन २२, २३ व २४ जानेवारीला होणार आहे. या संमेलनाला विदेशातूनही वाढता प्रतिसाद मिळत आहे. आहिरानी भाषा ही उत्तर महाराष्ट्राच्या धुळे, जळगांव, नंदुरबार, नाशिक, नगर जिल्ह्यात, मध्यप्रदेश व गुजराथच्या सिमावर्ती भागात, अमरावती जिल्ह्यातील मेळघाटात आणि नोकरी, व्यवसाय व उद्योगानिमित्त स्थलांतरित खान्देशी बंधुभगिनीमार्फत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरही बोलली जाते.ऐकली जाते. दुसरं ऑनलाईन विश्व आहिरानी भाषा संमेलनात तत्वज्ञ आणि विचारवंताच्या मुलाखती, मार्गदर्शन, परीसंवाद, चर्चासत्र, कथाकथन, काव्यगायन, पोवाडे यांचं सादरीकरण होणार आहे.<br />(रीपोर्ट - तुषार महाले)<br />#language #ahiranibhasha #ahiranilanguage #nashik #marathilanguage #marathibhasha