Surprise Me!

नांदेडमध्ये काँग्रेसचं वर्चस्व कायम; तीन नगरपंचायतीत विजय

2022-01-19 36 Dailymotion

जिल्ह्यातील नायगाव, माहूर, अर्धापूर येथील नगरपंचायत निकाल जाहिर झालाय. जिल्ह्यातील तीन नगरपंचायतीत 48 जागेसाठी १८३ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. नांदेड जिल्ह्यातील नायगाव, अर्धापूर व माहूर नगरपंचायतीचा निकाल स्पष्ट झाल्यानंतर नायगाव व अर्धापुर येथे काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाले असून यापूर्वीही या दोन्हीही नगरपंचाती काँग्रेसच्या ताब्यात होत्या ,त्या राखण्यात काँग्रेसला यश मिळालं आहे. ,तर अगोदरच राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेली माहूर नगरपंचायत यावेळीही राष्ट्रवादी काँग्रेसने बहुमत मिळविले आहे त्या पाठोपाठ जागा काँग्रेसने मिळविल्यामुळे माहूर नगरपंचायतीवर महाविकास आघाडीचे वर्चस्व निश्चित झाले आहे . नायगांवमध्ये 17 जागांपैकी 17 जागेवर काँग्रेस विजयी झालेत.अर्धापुरमध्ये एकूण सतरा पैकी 10 जागा जिंकत काँग्रेसला बहुमत मिळालं तर, माहूरमध्ये 17 जागांपैकी काँग्रेस 6 तर, राष्ट्रवादीने 7 जागा मिळवत विजय मिळला आहे.

Buy Now on CodeCanyon