Surprise Me!

भंडाऱ्याच्या 52 जिल्हा परिषदचे निकाल जाहीर,एक हाती सत्ता न मिळाल्याने समीकरणांना वेग

2022-01-19 7 Dailymotion

जिल्हा परिषद निवडणुकीनंतर भंडारा जिल्ह्याचे 52 जागांचे निकाल जाहीर झाले. यात विजयी उमेदवारांच्या समीकरणात जास्त बदल दिसून आले नाहीत. भंडारा जिल्ह्यात ही निवडणूक नाना पटोले यांच्याकरीता अस्तित्वाची मानली जात होती. जाहीर झालेल्या निकालानंतर काँग्रेस पक्ष 21 जागेवर विजयी झालाय. गेल्या कार्यकाळात काँग्रेसच्या 20 जागा निवडून आल्या होत्या. त्याच्या तुलनेत एकाच जागा वाढल्याने नाना पटोले हे फेल ठरल्याचे म्हटलं जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला 13 जागा, भाजपला 12 जागा मिळाल्या आहेत. तर शिवसेना, वंचित व बसपाला प्रत्येकी 1 जागेवर समाधान मानावं लागलंय. अपक्षांना 3 जागा मिळाल्या आहेत. नाना पटोलेंबाबत रोष असल्याने इथं राष्ट्रवादी भाजपबरोबर युती करण्याचीही शक्यता नाकारता येत नाही

Buy Now on CodeCanyon