Surprise Me!

बाजूलाच रेल्वे ट्रॅक आहे; अख्खा भारत बंद झालाच म्हणून समजा; आव्हाडांनी रेल्वेला धमकावलं

2022-01-22 387 Dailymotion

तुमची घरे राष्ट्रवादी कॉंग्रेस वाचविणार, एका घरालाही धक्का देऊ देणार नाही. वेळ आली तर काय करायचे ते आपल्याला माहितीच आहे. तुमच्या घरांच्या बाजूलाच रेल्वे लाइन आहे. मध्य रेल्वेची वाहतूक तीन तास बंद झाली तर समजा अख्ख्या भारत बंद होतो. हा ट्रॅक बंद झाल्यास मनमाड, भूसावळ, कुडवाडे अडकते, कुंडवाडे बंद झाले की दक्षिणेला जाणाऱ्या गाड्या अडकतात, असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी झोपड्यांवर कारवाई झाल्यास टोकाचं पाऊल उचलण्याचा इशारा दिला. रेल्वे प्रशासनाने रेल्वेच्या जागेवर राहणाऱ्या लोकांना सात दिवसात घरे रिकामे करण्यासंदर्भात नोटिसा धाडल्या आहेत. इतक्या वर्ष रेल्वे झोपली होती का, असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला. हे केवळ घाबरवण्यासाठी केले आहे, असे माझे मत आहे. आपण सगळे मिळून लढूया, हा माझ्या एकट्याचा लढा नसणार. भाषण देऊन चाललो पुन्हा येणार नाही असं वाटायला नको तुम्हाला म्हणून सांगतो. यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देखील मध्यस्ती करावी लागेल. असंही ते यावेळी म्हणाले.

Buy Now on CodeCanyon