Surprise Me!

शिर्डी पोलीस ठाण्याची नवी इमारत उद्घाटनाच्या प्रतीक्षेत

2022-01-23 8 Dailymotion

शिर्डीत कायदा सुव्यवस्था राखण्याची मोठी जबाबदारी पोलिसांवर असते. मात्र याच शिर्डी पोलिसांना आपले विविध विभाग चालवताना मोठी कसरत करावी लागते आहे. नुतन इमारतीच्या कामामुळे तीन वर्षांहून अधिक दिवसांपासून पोलीसांचं काम विश्रांतीगृहातून सुरू आहे. दरम्यान सहा महिन्यांपूर्वीच शिर्डी पोलीस ठाण्याच्या नुतन इमारतीचं बांधकाम पूर्ण झाले आहे. मात्र या इमारतीच्या उद्घाटनाला कधी कोरोना लॉकडाऊन तर कधी निवडणूक आचारसंहिता यामुळे विलंब होत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे राज्यसरकार या इमारतींच्या उद्घाटनाचा मुहूर्त कधी काढणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.

Buy Now on CodeCanyon