राज्य शासनाच्या सेवेत विलीनीकरण व्हावे म्हणून निकराचा लढा देणाऱ्या संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना खूप मोठ्या आर्थिक परिस्थितीला सामोरे जावे लागतयं. घरातील अन्न संपल्याने जगायचं कसं आणि खायंच काय असा प्रश्न एस.टी. कर्मचारी कुटुंबासमोर उभा आहे. याचीच दखल घेत जैन उद्योग समुहातर्फे एस.टी. कर्मचाऱ्यांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. जैन उद्योग समुहातर्फे जळगाव जिल्ह्यात 'स्नेहाची शिदोरी' हा अनोखा कार्यक्रम पार पडला. एसटी कर्मचाऱ्यांना मदत व्हावी यासाठी या समुहाच्यावतीने जळगावातील 200 संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना एक महिन्याचं किराणा वाटप करण्यात आलं. यावरचा हा स्पेशल रिपोर्ट...
