Surprise Me!

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना कोरोनाची लागण, ट्विटरवरुन माहिती

2022-01-24 368 Dailymotion

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. शरद पवारांनी ट्विट करत कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याची माहिती दिली आहे. ते म्हणाले की, माझी कोरोना पॉझिटिव्ह चाचणी आली आहे, परंतु काळजीचे कोणतेही कारण नाही. माझ्या डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे मी उपचार घेत आहे. गेल्या काही दिवसांपासून माझ्या संपर्कात असलेल्या सर्वांना मी विनंती करतो की त्यांनी स्वतःची चाचणी करुन घ्यावी आणि आवश्यक ती खबरदारी घ्यावी. राज्यात मिशन बिगेन अगेन सुरू झाल्यानंतर त्यांनी हळूहळू राज्यात सक्रीयपणे सहभाग घेत आपले दौरे केले. सुदैवाने कोरोनापासून ते दूर होते, पण तिसऱ्या लाटेत आता त्यांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत अनेक नेत्यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत खरबदारी म्हणून कोरोना नियमावली व निर्बंध आणखी कडक केले. यात अनेकांना कोरोनाची लागण झाली, परंतु रुग्णालयात दाखल होण्याची वेळ आली नाही. त्यामुळे, विलिगीकरणात राहूनचा कोरोनावर अनेक नेत्यांनी मात केली आहे.

Buy Now on CodeCanyon