Surprise Me!

जळगाव ग्रामीणमध्ये शाळा पुन्हा सुरु; विद्यार्थ्यांचे शाळेत उत्साहात स्वागत

2022-01-24 41 Dailymotion

कोरोनामुळे मागील दीड वर्षापासून शिक्षण क्षेत्र प्रभावित झाले आहे. तेव्हापासून शहरी भागासह ग्रामीण भागातील विद्यार्थांची किलबिलाट बंद होती. अखेर दीर्घ प्रतीक्षेनंतर राज्यातील शाळा आजपासून सुरु झाल्या आहेत. जळगाव जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शाळांची घंटा पुन्हा वाजली. दुसर्‍यांदा शाळा सुरू झाल्याने उत्साहात विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. जळगावील श्री स्वामी समर्थ माध्यमिक विद्यालयात ढोल ताशांचा गजरात विद्यार्थ्यांचे औक्षण करण्यात आले. विद्यार्थ्यांना मास्क आणि सॅनिटायझर वाटप करत शाळेत प्रवेश देण्यात आला. शाळा सुरु झाल्याने बालगोपालांसह शिक्षकांमध्येही उत्साहाचं वातावरण पाहायला मिळाले.

Buy Now on CodeCanyon