Surprise Me!

तमाशा कलावंतांमध्ये आनंदाचं वातावरण; राज्यात पुन्हा रंगणार तमाशाचा फड

2022-01-25 98 Dailymotion

कोरोना महामारी आणि त्यामुळे करण्यात आलेलं लॉकडाऊन तसंच अनेक गोष्टींसाठी निर्बंध घालण्यात आल्याने याचा मोठा फटका अनेक क्षेत्रांना बसला आहे. यामुळे सर्वसामान्यांचं जनजीवन विस्कळीत झालं आहे. कोरोनाच्या निर्बंधांमुळे तमाशा कलावंतही अडचणीत आले होते. मात्र, आता या कलावंताना मोठा दिलासा मिळाला आहे. राज्यात 1 फेब्रुवारीपासून तमाशा सादरीकरणाला परवानगी देण्यात आली आहे. लावणी सम्राञी सुरेखा पुणेकर यांनी आपला एक व्हिडिओ शेअर करत तमाशा कलावंतना 1 कोटींची मदत केल्याबद्दल आणि 1 फेब्रुवारीपासून तमाशा सादरीकरणाला परवानगी दिल्याबद्दल राज्य सरकारचे आणि राष्ट्रवादीचे जाहीर आभार मानले आहेत. या निर्णयामुळे कलाकारांना दिलासा मिळाल्याचं त्यांनी म्हटलं आहे. सुरेखा पुणेकर यांनी व्हिडिओच्या माध्यमातून कलाकारांच्या व्यथाही मांडल्या आहेत.

Buy Now on CodeCanyon