Surprise Me!

गोव्यात आणखी एक मोठा नेता बंडाच्या तयारीत; फडणवीसांचं टेन्शन वाढलं

2022-01-27 54 Dailymotion

माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे चिरंजिव उत्पल पर्रिकर यांसारख्या दिग्गजांनी भाजपला दणका दिल्यानंतर आणखी एक मोठा नेता बंडाच्या तयारीत असल्याचं दिसतंय. हा नेता दुसरा तिसरा कुणी नसून केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांचा मुलगा सिद्धेश नाईक आहे. सध्या जिल्हा परिषद सदस्य असलेले श्रीपाद नाईक यांना दुसऱ्या यादीत तरी आपलं नाव जाहीर होईल, अशी अपेक्षा होती. पण भाजपने सहा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आणि ही आशा मावळली. या मावळलेल्या आशेसोबतच त्यांनी बंडाचा झेंडाही काढलाय. <br /><br />अगोदर ३४ उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली होती, ज्यात नाव नसल्याने अनेक नेते अस्वस्थ होते. आता दुसऱ्या यादीनंतर ही अस्वस्थता अजूनच वाढलीय. <br /><br />सिद्धेश श्रीपाद नाईक हे कुंभारजुवे मतदारसंघातून इच्छुक होते. पण उत्पल पर्रिकर यांच्याप्रमाणेच भाजपने सिद्धेश नाईक यांनाही उमेदवारी नाकारली. आता या नाकारलेल्या उमेदवारीमुळे झेडपी सदस्य असलेले सिद्धेश नाईक कमालीचे अस्वस्थ झालेत.

Buy Now on CodeCanyon