केंद्रीय मंत्री नारायण राणे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोडून सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल झाले आहेत. आमदार नितेश राणे यांच्या पोलीस कोठडीची दोन दिवसांची मुदत आज संपत आहे. या पार्श्वभूमीवर नारायण राणे हे जिल्ह्यात दाखल झाले आहेत. त्यामुळे राजकीय घडामोडींना देखील वेग आला आहे. काही वेळात नितेश राणे यांना कणकवली न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे. यावेळी त्यांच्या पोलीस कोठडीत पुन्हा वाढ होते का याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. नितेश राणे यांना न्यायालयीन कोठडी मिळाल्यास ते जामिनासाठी जिल्हा न्यायालयात अर्ज दाखल करू शकतात