Surprise Me!

'फिटनेस फ्रिक' सेलिब्रिटी जिम लुकमध्ये दिसतात असे!

2022-02-10 24 Dailymotion

बॉलिवूडचे सगळेच कलाकार आपल्या फिटनेसच्या बाबतीत नेहमीच जागरूक असतात. त्यात बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खानला 'फिटनेस फ्रिक' गर्ल म्हणून ओळखली जाते. साराचा 'जिम लुक' नेहमीच चर्चेचा विषय असतो. तिचा हा लुक टिपण्यासाठी कॅमेरेही सदैव तयार असतात. यासोबतच अभिनेत्री खुशी कपूर आणि रिया चक्रवर्ती यांनाही जिम बाहेर स्पॉट करण्यात आलं. यावेळी दोघीही एकदम स्टायलिश अंदाजात दिसल्या आहे. या दोघींचे फोटोज चाहत्यांच्या चांगलेच पसंतीस उतरतात. टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याची पत्नी नताशा स्टानकोविच देखील स्पॉट झाली. नताशा स्टानकोविच नेहमीच तिच्या बोल्ड अंदाजामुळे चर्चेत पाहायाला मिळत असते. 'बिग बॉस 13' मधला अभिनेता असीम रियाझला देखील जिम बाहेर स्पॉट करण्यात आलं. यासोबत बॉलीवूड अभिनेत्री किम शर्मा आणि लिएंडर पेस यांना वर्कआउटनंतर स्पॉट करण्यात आलं. किम शर्मा आणि लिएंडर पेसने त्यांच्या नात्याबद्दल सोशल मीडियावर अधिकृतपणे माहिती दिली आहे.

Buy Now on CodeCanyon