Surprise Me!

व्हॅलेंटाईन डेच्या तोंडावर शमिता-राकेशची दागिने खरेदी, व्हिडिओवरुन चर्चांना उधाण

2022-02-12 7 Dailymotion

अभिनेत्री शमिता शेट्टी आणि राकेश बापट शुक्रवारी मुंबईतील एका ज्वेलरी स्टोअरमध्ये दिसले. व्हॅलेंटाईन डेच्या काही दिवस आधी दागिन्यांच्या खरेदीसाठी गेले असताना ते दोघे पांढर्‍या रंगाच्या कपड्यात दिसले. अंधेरीतल्या ओरा फाईन ज्वेलरीमध्ये एकत्र खरेदीसाठी गेले असल्याने सोशल मीडियावर चर्चांना उधाण आले आहे. व्हॅलेंटाईन डेच्या काही दिवस आधी दागिन्यांच्या खरेदीसाठी गेले असावेत असा अंदाज अनेकांनी व्यक्त केलाय. दोघांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्याच्या चाहत्यांनी त्यांच्या फोटोवरती कमेंट देखील केल्या आहेत. तसेच दोघेही अधिक सुंदर दिसत असल्याचे अनेक चाहत्यांनी सांगितले. बिग बॉसच्या एका सीजनमध्ये राकेश बापट आणि शमिता शेट्टी यांचं सुत जुळल्याचं आपण पाहिलं आहे. तेव्हापासून ते दोघेही अनेकदा एकत्र दिसले आहेत. तसेच राकेश बापट शमिता शेट्टीला डेट करत असल्याची देखील चर्चा आहे.

Buy Now on CodeCanyon