Surprise Me!

नागपूरला जाणारा द्राक्षाचा ट्रक उलटला; घटनास्थळावरील स्थानिकांचा द्राक्षांवर डल्ला

2022-02-13 812 Dailymotion

ओव्हरटेक करण्याच्या नादात भरधाव ट्रकने समोरुन येणाऱ्या ट्रकला धडक दिली. या भीषण अपघातात ट्रकचालकाचा जागीच मृत्यू झाला. तर क्लिनर गंभीर जखमी झाला. हा अपघात पुलगाव येथून १३ कि.मी अंतरावर असलेल्या केळापूर जवळ १२ रोजी शनिवारी रात्रीच्या सुमारास झाला. या अपघातात रवी भास्कर जाधव याचा जागीच मृत्यू झाला. तर प्रकाश लष्कर हा गंभीर जखमी झाला. तसंच ज्या ट्रकला धडक दिली, त्या ट्रकमधील चालक अमोल घुगरे आणि क्लिनर शेख गफ्फार शेख रहीम यांना किरकोळ मार लागला. ट्रकचा समोरील भाग पूर्णत: चक्काचूर झाला आहे. ट्रकचेही मोठे नुकसान झाले असल्याची माहिती पोलिसांनी दिली. अपघातग्रस्त ट्रकमधील द्राक्षांचा सडा रस्त्याच्या कडेला पडला. रस्त्याच्या कडेला पडलेला सडा तसंच कॅरेटमधील द्राक्षावर लोकांच्या उड्या पडल्या. अपघातात ट्रकचालकाचा मृत्यू झाल्यापासून अनभिज्ञ नागरिकांनी द्राक्ष नेण्यासाठी गर्दी केली. काही नागरिक थैलीत तर काही रुमालात बांधून द्राक्ष नेत होते. रस्त्यावरुन कारने जाणाऱ्या अनेकांनीही वाहन थांबवत सोनं लुटतात तसे द्राक्ष लुटले.

Buy Now on CodeCanyon