Surprise Me!

ड्रग्ज प्रकरणानंतर पहिल्यांदाच आर्यन खान सुहानासह एअरपोर्टवर दिसला

2022-02-14 56 Dailymotion

ड्रग्ज प्रकरणामुळे वादात अडकलेल्या आर्यन खानचं नाव अचानक सोशल मीडियावर ट्रेंडिगमध्ये आलं होतं. आयपीएलच्या पंधराव्या हंगाम लिलावासाठी शाहरूख खानऐवजी यावेळी आर्यन खान आणि सुहाना खान सहभागी झाले होते. बऱ्याच दिवसांनंतर आर्यन खान सार्वजनिक जीवनात सक्रिय झाला असून बहीण सुहाना खानसोबत तो एअरपोर्टवर दिसला. बॉलिवूड अभिनेता इमरान हाश्मीला देखील बर्‍याच दिवसानंतर एअरपोर्टवर स्पॉट करण्यात आले. अपकमिंग चित्रपट 'सेल्फी'चा टीजर रिलीज झाला इमरान हाश्मी अभिनेता अक्षय कुमार सोबत दिसणार आहे. 'वन्स अपॉन ए टाईम इन मुम्बई' या चित्रपटानंतर अक्षय आणि इमरान मोठ्या पडद्यावर दुसऱ्यांदा एकत्र दिसणार आहेत. यावेळी 'बिग बॉस'फेम अली गोनीदेखील विमानतळावर हटक्या आणि कूल अंदाजात स्पॉट झाला. 'बिग बॉस 14' मध्येच अली आणि जास्मीन यांची केमिस्ट्री चाहत्यांना खूपच आवडली होती. अलीने शोमध्येच जास्मीनला प्रपोज केले होते.

Buy Now on CodeCanyon