Surprise Me!

अ थर्सडे' चित्रपटाची उत्सुकता शिगेला; 16 मुलांच्या अपहरणाचं थरारनाट्य

2022-02-14 1 Dailymotion

अभिनेत्री यामी गौतम लवकरच तिचा आगामी चित्रपट 'अ थर्सडे' मधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 'अ थर्सडे' या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला असून थरारक अंदाज पाहिल्यावर सर्वच हैराण झाले आहेत. या चित्रपटात यामीसोबत डिंपल कपाडिया, नेहा धुपिया आणि अतुल कुलकर्णी मुख्य भूमिका आहेत. यामी गौतमची प्रमुख भूमिका असलेला 'अ थर्सडे' हा एक सस्पेन्स थ्रीलर चित्रपट आहे. हा चित्रपट १७ फेब्रुवारीला हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. यावेळी यामी गौतम, नेहा धुपिया आणि अतुल कुलकर्णी 'द कपिल शर्मा'च्या शो दरम्यान प्रमोशन करताना स्पॉट झाले. या सस्पेन्स थ्रीलर चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान सर्वांनी काळ्या रंगाचे आऊटफिट परिधान केले होते.

Buy Now on CodeCanyon